Pimpri Corona News : प्लाझ्माच्या अँटीबॉडी टेस्टिंग किटसाठी पीएसआय ब्लड बँकेला 51 हजारांची मदत

सामाजिक कार्यकर्ते विकास गर्ग यांच्या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक

0

एमपीसीन्यूज : चिंचवड येथील पूर्णानगर विकास कृती समितीचे अध्यक्ष विकास गर्ग यांनी कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी आवश्यक असलेल्या प्लाझ्मासाठी प्लाझ्माच्या मोफत स्क्रिनिंगसाठी लागणाऱ्या अँटीबॉडी टेस्टिंग किटसाठी पीएसआय ब्लड बँकेला 51 हजारांची मदत केली आहे. गर्ग यांच्या या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. शिवाय शहराबाहेरील कोरोनाबाधित रुग्णांवरही शहरातील महापालिका तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. कोरोना रुग्णांवरील उपचारात प्लाझ्माची मात्रा  परिणामकारक ठरत आहे. प्लाझ्मा मिळाल्याने अनेक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे प्लाझ्माची मागणीही वाढली आहे.

मात्र, प्लाझ्मा घेण्यापूर्वी प्लाझ्मा दात्यांची रक्तपेढीत तपासणी ( स्क्रीनिंग) केली जाते. त्यात अँटीबॉडी आणि प्रोटीनची तपासणी करून प्लाझ्मा दान करण्याबाबत निर्णय घेतला जातो. त्यामुळे ही तपासणी गरजेची आहे.

_MPC_DIR_MPU_II

तसेच या तपासणीसाठी लागणाऱ्या अँटीबॉडी टेस्टिंग किटसाठी प्रत्येकी पाचशे रुपये खर्च येतो. हा खर्च टाळण्यासाठी व ही तपासणी मोफत करता यावी यासाठी पूर्णानगर विकास कृती समितीचे अध्यक्ष विकास गर्ग यांनी पिंपरी-खराळवाडी येथील पीएसआय ब्लड बँकेला अँटीबॉडी टेस्टिंग किटसाठी आर्थिक मदत करण्याचा निर्णय  घेतला.

तसेच त्यांनी रोख 51 हजार रुपयांची मदत पीएसआय ब्लड बँकेचे प्रशासकीय प्रमुख डॉ. दीपक पाटील यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी डॉ. ए. बी. पाटील, अनिल मित्तल, संभाजी बालघरे, सुनील कदम, विनोद रोकडे आदी उपस्थित होते.

या मदतीमुळे शंबर अँटीबॉडी टेस्टिंग किट उपलब्ध होणार आहेत. त्याचा उपयोग पीएसआय ब्लड बँकेच्या प्लाझ्मा दान शिबीर आणि खराळवाडी येथील केंद्रात प्लाझ्मा संकलनासाठी होणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment