Pimpri Corona News : डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित पोलिसांसाठी 30 बेडचा सुसज्ज वॉर्ड

0

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कोरोना बाधित पोलिसांसाठी पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे 30 बेडचा सुसज्ज वॉर्ड तयार करण्यात आला आहे. साहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे यांच्या विशेष प्रयत्नातून या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. संबंध देशभरात बेडची चणचण भासत असताना पोलिसांसाठी अशी व्यवस्था होणे ही पोलिसांसाठी दिलासादायक बाब आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त सुधीर हिरेमठ, मंचक ईप्पर, आनंद भोईटे, डॉ. यशराज पाटील, डॉ. जे एस भवाळकर, डॉ. एच एस. चव्हाण यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कोरोनाबाधीत पोलीसांकरीता 30 बेडच्या एका वार्डचे उदघाटन करण्यात आले. शुक्रवारी (दि. 23) दुपारी पिंपरी येथे हा कार्यक्रम झाला.

सध्या देशामध्ये थैमान घातलेल्या कोरोना या संसर्गजन्य साथीच्या रोगाची साथ सुरु आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे समाजातील सर्व स्तरावर मिसळुन कोरोना बद्दलच्या नियमांची अंमलबजावणी व्हावी याकरीता आपले कर्तव्य बजावीत आहेत. त्यामुळे कोरोनाची बाधा होण्याची शक्यता ही सर्वात जास्त पोलीसांना आहे.

कोरोना विरोधी लढ्यामध्ये पोलीस हे फ्रंटलाईन वॉरीयर्स म्हणून काम करीत आहेत. आजपर्यंत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 791 पोलीस हे कर्तव्यादरम्यान कोरोना बाधीत झाले आहेत. त्यातील चार पोलीस अंमलदार यांनी कोरोना विरोधी लढ्यामध्ये आपला जीव गमावुन हुतात्मा झाले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

त्याकरीता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलीस अंमलदारांसाठी कोरोना आजारापासून बचावाकरीता वेळोवेळी मास्क, सॅनिटायझर, हॅण्डग्लोज, गॉगल्स, इत्यादी साहित्य उपलब्ध करुन दिले आहे.

अधिकारी व अंमलदार यांना आयुर्वेदिक काढा व गरम पाणी घेणेबाबतच्या सूचना देण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधीत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना ऑक्सिजन, बेड, रेमडेसिवीर इंजेक्शन तसेच इतर आवश्यक औषधे वेळेत उपलब्ध करुन दिले जात असून पोलीस आयुक्तालयाकडून या सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहे.

या परिस्थीतीत पोलिसांचे मनोबल खचून जाऊ नये म्हणून पोलीसांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी कर्तव्यादरम्यान कोरोनाची लागण झाल्यास त्यांना उपचाराकरीता तात्काळ बेड उपलब्ध होऊन योग्यरित्या उपचार व्हावे या उद्देशाने डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड पोलीसांसाठी सध्या बेड मिळणे जिकरीचे झाले असल्याने डी. वाय. पाटील प्रशासनाशी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी संपर्क साधून विनंती केली असता त्यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला.

डी. वाय. पाटील हॉस्पीटल, पिंपरी येथे 30 बेडचा विशेष कक्ष हॉस्पिटलने पोलिसांसाठी निर्माण करून दिला आहे. सर्व 30 बेड हे ऑक्सीजन पुरवठायुक्त असणार आहेत. तसेच क्रेडाई पुणे चे अध्यक्ष फरांदे यांच्या माध्यमातून या वार्डसाठी पाच व्हेंटीलेटर सुध्दा पुरविण्यात येणार आहेत.

कोरोना संक्रमणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस व त्यांचे कुटुंबियांना तात्काळ उपचार मिळावे यासाठी डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय कटीबध्द आहे. यामुळे पोलीस दलाचे मनोधैर्य उंचावले असून कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय सुसज्य आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment