Pimpri Corona News : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपूर्वी बालरोगतज्ज्ञ समितीची नियुक्त करा- दीपक मोढवे

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका आहे, अशी भिती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. लहान मुलांमधील कोविडच्या लक्षणांचा अभ्यास करुन त्यावर मात करण्यासाठी बालरोगतज्ज्ञांची नियोजन समिती लवकरात लवकर तयार करावी, अशी मागणी भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, महापालिका प्रशासनाने बालरोग तज्ज्ञांच्या समितीमध्ये पिंपरी-चिंचवडमधील बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश करावा. कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वीच प्राथमिक लक्षणे, उपचार आणि इन्फ्रास्ट्रक्चर पद्धतीबाबत अभ्यास करण्याची जबाबदारी संबंधित समितीकडे सोपवण्यात यावी. तसेच, या समितीच्या तज्ज्ञांनी बालरोग डॉक्टरांना प्रशिक्षण द्यावे.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी-चिंचवडमध्ये किती बालरोग्य तज्ज्ञ आणि लहान मुलांची रुग्णालये उपलब्ध आहेत. त्यामध्ये उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधा आणि कमतरता याचा अभ्यास करण्यात यावा. लहान मुलांसाठी आरोग्य मार्गदर्शनपर हेल्पलाईनही सुरू करण्यात यावी. यापुढील काळात समितीच्या माध्यमातून कोविड प्रतिबंधक उपायोजनांवर नियंत्रण ठेवण्याची भूमिका समितीने घ्यावी.

पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना कोरोना विषाणुच्या दुस-या लाटेचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. ज्यांनी कोरोना विषाणुवर यशस्वीपणे मात केली त्यातील काहींना आता म्युकरमायकोसिस आजाराचा त्रास होऊ लागला आहे. विशेषतः मधुमेह असलेल्या नागरिकांमध्ये या आजाराची लक्षणे वाढत आहेत.

यापार्श्वभूमीवर प्रशासनाने मधुमेह असलेल्या नागरिकांना प्राधान्याने लस देण्याबाबत विचार केला पाहिजे. मधुमहे असलेल्या नागरिकांना वेळोवेळी शूगर चेक करावी लागते. शूगर लेव्हल स्थिर ठेवण्यासाठी तज्ञ डॉक्टरांकडे उपचार घ्यावे लागतात. ते उपचार घेत असलेल्या डॉक्टरांचे प्रमाणपत्र घेऊन अशा रुग्णांना प्राथमिक स्तरावर कोविड प्रतिबंधक लस देणे गरजेचे आहे. लस दिल्यानंतर म्युकरमायकोसिस विषाणुचा प्रतिकार करण्यासाठी त्यांच्या शरिरामध्ये प्रतिकार शक्ती तयार होईल. त्यांना होणारा धोका टळेल, असे मोढवे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.