Pimpri Corona news: ‘रुग्णवाहिकेसाठी ‘या’ नंबरवर संपर्क साधा, निशुल्क सेवा मिळेल’

0

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील कोरोना बाधित रुग्णांना तातडीने आवश्यकता असल्यास रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिकेने तीन संपर्क क्रमांक दिले आहेत. त्यावर संपर्क केल्यास तत्काळ मोफत रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका व बीव्हीजी एमईएमएस (Maharashtra Emergency Medical Services) यांच्या संयुक्त विद्यमाने ही सेवा पुरविण्यात येणार आहे.

यापूर्वी सगळ्यांना ज्ञात असलेला 108 क्रमांक आणि महापालिकेच्या 020-67331154/020-67332101 या क्रमांकावर फोन केल्यास तातडीने रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचणे सोयीस्कर होणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

याबाबतची माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली आहे. ही हेल्पलाईन 24X7 उपलब्ध असणार आहे. ही संपूर्ण सेवा निःशुल्क असणार आहे.

त्याचबरोबर पिंपरी-चिंचवड महापालिकेने यापूर्वीच कोरोना आजाराने मृत पावलेल्या रुग्णांसाठी स्मशानभूमीतील प्रतिक्षा कालावधी कमी करण्यासाठी 020-67331155 ही हेल्पलाईन सुरु केलेली आहे.

जेणेकरून कोणत्या जवळच्या स्मशानभूमीमध्ये कोरोनाने मृत पावलेल्या रुग्णास नेऊन तिथे अंतिम संस्कार करता येतील व प्रतिक्षा कालावधी कमी करण्यासाठी ही सेवा 24×7 तास सुरु राहणार असल्याचे आयुक्त पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment