Pimpri corona News: दिवसभरात 278 लाभार्थ्यांनी घेतली कोरोनाची लस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील 278 जणांनी आज (मंगळवारी) कोरोनाची लस घेतली. दरम्यान, शनिवारी 456 जणांनी लस घेतली होती. त्यातुलनेत आज लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळाला. आजपर्यंत 734 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना पहिल्या टप्यात लस दिली जात आहे. लसीकरणासाठी वैद्यकीय क्षेत्रातील 18 हजार जणांची नोंद झाली आहे. पहिल्या टप्प्यात कोरोनाचे शहरासाठी 15 हजार डोस प्राप्त झाले आहेत. शनिवारपासून शहरात लसीकरणास सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या आठ रुग्णांलमध्ये लस देण्यात येत आहे.

आज दिवसभरात यमुनानगर रुग्णालयात 31 जणांनी लस घेतली. नवीन जिजामाता रुग्णालय (6), नवीन भोसरी रुग्णालय (43), वायसीएम रुग्णालय (62), पिंपळेनिलख दवाखाना (39), कासारवाडी दवाखाना (38), तालेरा रुग्णालय (43) आणि ईएसआयएस रुग्णालयात 16 अशा 278 जणांनी आज लस घेतली, अशी माहिती अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली.

_MPC_DIR_MPU_II

आरोग्य सेवा देणा-या नोंदणीकृत अधिकारी, कर्मचा-यांना प्राधान्याने लस देण्यात येत आहे. दिवसभरामध्ये एका केंद्रावर 100 लाभार्थ्यांना लस देण्याचे नियोजन आहे. चार आठवड्यानंतर लसीचा दुसरा डोस दिला जातो.

कोविन ॲपद्वारे लाभार्थींच्या नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएसद्वारे संदेश पाठविला जाणार आहे. त्यामध्ये लसीकरण, दिनांक, वेळ व स्थळ याचा उल्लेख असणार आहे.

लस टोचल्यानंतर लस टोचकणारे अधिकारी लाभार्थ्यांना लसीबाबत माहिती देतात. लस टोचल्यानंतर त्रास झाल्यास करावयाच्या उपाययोजना, लसीच्या चार आठवड्यानंतर येणा-या दुस-या डोसची तारीख, तसेच लस टोचल्यानंतर आर्धा तास निरीक्षक कक्षामध्ये निरिक्षणाखाली थांबण्यासाठी सुचित करण्यात येते.

लसीकरण झाल्यानंतर देखील लाभार्थ्यांनी सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर किंवा साबणाद्वारे वारंवार हाताची स्वच्छता करणे गरजेचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.