Pimpri Corona News : पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वतीने महापालिकेला पाच व्हेंटिलेटर

एमपीसीन्यूज : कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकार अहोरात्र काम करीत आहे. ज्या ठिकाणी संसाधनाचा तुटवडा निर्माण होत आहे. त्या ठिकाणी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वतीने शिवसेनेचे उपनेते रविंद्र मिर्लेकर आणि पदाधिकारी प्रत्यक्ष मदत पोहचवित आहेत. त्या अंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेस पाच व्हेंटिलेटर देण्यात आल्याची माहिती शिवसेना संपर्क प्रमुख बाळा कदम यांनी दिली.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलेले पाच व्हेंटिलेटर गुरुवारी (दि. 27 मे) शिवसेना उपनेते रविंद्र मिर्लेकर यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महापालिकेस देण्यात आले.

यावेळी संपर्क नेते बाळा कदम, खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले, माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, गटनेते राहुल कलाटे, शिवसेना शहर संघटीका सुलभा उबाळे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष दस्तगीर मणीयार, कामगार नेते इरफान सय्यद, निलेश हाके, श्रीनिवास आदमाने, नितीन गायकवाड, शुभम तेली, राहुल शर्मा, गणेश शितोळे आदी उपस्थित होते.

आयुक्त राजेश पाटील व अतिरीक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी हे व्हेंटिलेटर स्वीकारले. कोरोना महामारीच्या लढाई विरोधात शिवसेनेच्या माध्यमातून महापालिका प्रशासनाला वेळोवेळी मदत केली जात आहे, असे शिवसेना शहरप्रमुख सचिन भोसले यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.