Pimpri corona News: इंग्लंडहून आलेले आणखी चार जण पॉझिटीव्ह; आज 167 नवीन रुग्णांची नोंद

198 जणांना डिस्चार्ज; 9 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 167 नवीन रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 96 हजार 483 वर पोहोचली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 198 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

इंग्लंडहून आलेले आणखी चार जण पॉझिटीव्ह आले आहेत. नवीन स्ट्रेनच्या सहा रुग्णांवर भोसरी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरातील दोन आणि महापालिका हद्दीबाहेरील सात अशा नऊ जणांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात चिंचवड येथील 74 वर्षीय पुरुष, सांगवीतील 55 वर्षीय महिला, चाकण येथील 63 वर्षीय पुरुष, जुन्नर येथील 58, 65 वर्षीय दोन पुरुष, अमरावती येथील 67 वर्षीय पुरुष, देहुरोडमधील 39 वर्षीय पुरुष, विश्रांतवाडीतील 44 वर्षीय पुरुष आणि आळंदीतील 60 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 96 हजार 483 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 93 हजार 305 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1754 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 729 अशा 2483 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 640 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1389 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.

इंग्लंडहून आलेले आणखी चार पॉझिटीव्ह

इंग्लंडहून विमानाने मायदेशी परतलेल्या व मुंबईत उतरलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील 267 प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी 188 प्रवाशांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 153 जणांचे अहवाल निगेटीव्ह आहेत.तर, सहा जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आहेत. उर्वरित 26 अहवाल प्रलंबित आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.