Pimpri Corona News: कोरोना जैववैद्यकीय कचरा वाढला; विल्हेवाटीसाठी 29 लाखांचा खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कोरोना जैववैद्यकीय कच-यात देखील वाढ झाली आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एकूण 29 लाख 1 हजार रुपये खर्च झाला आहे.

महापालिकेच्या 32 दवाखाने, तर आठ रुग्णालयांसह संलग्न रुग्णालयांमधून जैववैद्यकीय घनकचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. त्याचे कंत्राट पास्को एन्व्हायर्नमेंटल सोल्युशन यांना दिले आहे. महापालिका रुग्णालये, खासगी रुग्णालये, दवाखाने, लॅबोरेटरीज, क्वारंटाइन सेंटर्स, आयसोलेशन सेंटर्स आणि इतर सर्व कोविड कचरा निर्माण होणाऱ्या ठिकाणाहून पास्को एन्व्हायर्नमेंटलमार्फत कचरा गोळा केला जातो.

त्यांना प्रतिमहिना 15 हजार रुपये फिक्स चार्जेस वाहतुकीसाठी आणि 100 रुपये प्रतिकिलो कोविड कचरा निर्मुलनासाठी दिले जाते. नोव्हेंबर महिन्यात त्यांनी 53 ठिकाणांहून कचरा वाहतूक केला आहे. प्रतिमहिना 15 हजार रुपये फिक्स चार्जेस वाहतुकीनुसार, 7 लाख 95 हजार रुपये अधिक कोरोना कचरा निर्मुलनासाठी 100 रुपये प्रतिकिलो दरानुसार 21 लाख 6 हजार रुपये, असा एकूण 29 लाख 1 हजार रुपये खर्च झाला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.