Pimpri corona News : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्यांना कोरोनाचा संसर्ग

त्यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विरोधी पक्षनेते काटे यांनी बुधवारी कोरोना चाचणी केली होती. त्याचा अहवाल गुरुवारी दुपारी आला. त्यामध्ये काटे पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले आहे.

साई चौक, जगताप डेअरी येथील ग्रेड सेपरेटर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून या ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन गुरुवारी महापौर उषा ऊर्फ माई ढोरे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते पार पडले आहे.

या कार्यक्रमासाठी नाना काटे यांनी हजेरी लावली होती.

सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसदस्य शत्रुघ्न उर्फ बापू काटे, संदिप कस्पटे, नगरसदस्या ममता गायकवाड, आरती चोंधे, शितल काटे, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंबासे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होते. त्यामुळे अनेकांचे विलगीकरण होणार असल्याची चर्चा सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.