_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pimpri Corona News : संभाव्य तिसरी लाट ! म्हाडाच्या इमारतीत लहान मुलांसाठी कोविड केअर सेंटर तयार करणार

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी महापालिकेने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. पिंपरी वाघेरे येथील म्हाडा इमारत ताब्यात घेऊन तेथे लहान मुलांसाठी कोविड केअर सेंटर तयार करण्यात येणार आहे. मासुळकर कॉलनी येथील प्रस्तावित आय हॉस्पिटल हे लहान मुलांसाठी कोविड रुग्णालय म्हणून 50 बेड साठी तयार केले जाणार असून महापालिका रुग्णालयात लहान मुलांसाठी बेडची उपलब्धता केली जात आहे.

कोरोनाची दुसरी लाट स्थिरावत असतानाच तिसरी लाट येण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे. या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचा तज्ञांचा अंदाज आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय सेवा सुसज्ज ठेवण्याबाबत आयुक्त राजेश पाटील यांनी आज (बुधवारी) महापालिकेचे सर्व वैद्यकीय अधिकारी व संबंधितांसोबत बैठक घेतली.

_MPC_DIR_MPU_II

कोविड-19 तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक ठरणार असल्याचा तज्ञांचा अंदाज आहे. त्यासाठी वायसीएम रुग्णालयामध्ये 150 ते 200 बेड राखीव ठेवणे. तसेच 15-15 बेडचे दोन आयसीयू व पिंपरी येथील नवीन जिजामाता रुग्णालय हे लहान मुलांसाठी कोविड रुग्णालय म्हणून तयार करण्यात येणार आहे. त्याठिकाणी 100 ऑक्सिजन बेडची उपलब्धता असेल.

मासुळकर कॉलनी येथील प्रस्तावित आय हॉस्पिटल हे लहान मुलांसाठी कोविड रुग्णालय म्हणून 50 बेड साठी तयार करणे. तसेच पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील बालरोग तज्ञ डॉक्टर्स आणि रुग्णालय याची माहिती घेवून व त्याबाबत तयारी करणे. तसेच पिंपरी वाघेरे येथील 100 फुटी रस्त्यालगत असलेल्या म्हाडा इमारती महापालिकेने ताब्यात घेवून त्या ठिकाणी लहान मुलांसाठी कोविड केअर सेंटर तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यासाठी लागणारी सर्व साहित्य, उपकरणे, लहान मुलांसाठीचे वेंटीलेटर्स उपलब्ध करणे व त्यासाठीचा लागणारा मनुष्यबळ व आवश्यक तो औषधे साठा करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.