_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pimpri Corona News : ‘जम्बो’त रुग्णांचे दागिने, मौल्यवान वस्तूंची चोरी होऊ नये यासाठी अधिक दक्षता घ्या’

मुख्य समन्वयक अधिकारी सुनील अलमलेकर यांच्या सूचना

एमपीसी न्यूज – रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व व्यवस्थापन कोविड सेंटरमधील रुग्णांची योग्य दक्षता घेण्यासाठी 24 कार्यरत असतात. रुग्णांचे दागिने, मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याबाबतच्या घटना घडू नयेत यासाठी अधिक दक्षता व काळजी घेण्याच्या सूचना नेहरूनगर येथील जंबो कोविड रुग्णालयाचे मुख्य समन्वयक अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त सुनील अलमलेकर यांनी दिले.

नेहरूनगर येथील जंबो कोविड रुग्णालयात दाखल होणा-या रुग्णांकडील दागिने, मोबाईल तसेच इतर मौल्यवान वस्तूंचे हस्तांतरण रुग्णांच्या जवळच्या नातेवाईकांकडे केले जाते. या सर्व प्रक्रीयेचा आढावा तसेच संबंधितांना योग्य त्या सूचना देण्यासाठी आज नेहरूनगर येथील जंबो कोविड रुग्णालयाचे मुख्य समन्वयक अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त सुनील अलमलेकर यांच्या अध्यक्षेतेखाली रुग्णालय व्यवस्थापन, सुरक्षा, तांत्रिक विभाग, स्थापत्य, विद्युत विभाग यांच्या समवेत सुरक्षा विषयक बैठक घेण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

जम्बो कोविड व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयात रुग्णांना दाखल करण्यापूर्वी रुग्णाचे दागिने, मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तू सोबतच्या नातेवाईकांकडे देण्याच्या सूचना दिल्या जातात. तशा प्रकारचे संमतीपत्र रुग्णाच्या नातेवाईकाकडून लेखी स्वरुपात घेतले जाते. असेच लेखी संमतीपत्र मृतदेह ताब्यात घेणा-या नातेवाईकांकडून घेतले जाते.

त्या संमतीपत्रावर मृत व्यक्तीच्या जवळील दागिने, मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तू चोरी अथवा गहाळ झाल्यास त्यास कोणतेही अधिकारी, कर्मचारी, व्यवस्थापन जबाबदार असणार नाही असे नमूद केलेले असते व त्यावर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांची स्वाक्षरी घेतली जाते.

या बैठकीस नेहरूनगर येथील जंबो कोविड रुग्णालयाचे व्यवस्थापक डॉ. सुनील पवार, डॉ. परमानंद चव्हाण, मेड ब्रोज कंपनीचे प्रतिनिधी डॉ. पद्माकर पंडित, डॉ. किरण, प्रशासन अधिकारी मुकेश कोळप, उपअभियंता आर.बी.जगताप, सुरक्षा अधिकारी विलास वाबळे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कनिष्ठ अभियंता संतोष कुदळे, तानाजी ढेकळे, हृषीकेश कांबळे, मल्टीपर्पज वर्कर महेश निकम, JESS IDEA’s कंपनीचे अर्पित ठक्कर, भावेश ठक्कर, अजित ठक्कर Cell Beans Health Care कंपनीचे सिद्धार्थ रणदिवे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.