Pimpri Corona News : दान पेटीत जमा झालेल्या निधीतून दहा ऑक्सिजन बेड ; मित्र सहकार्य तरुण मंडळाचा उपक्रम

एमपीसी न्यूज – दान पेटीत जमा झालेल्या निधीतून दहा ऑक्सिजन बेड पालिकेच्या जिजामाता रुग्णालयाला भेट देण्यात आले. पिंपरी गावातील मित्र सहकार्य तरुण मंडळाने हा अभिनव उपक्रम राबविला. नगरसेविका निकीता कदम यांच्या हस्ते आज (शुक्रवारी, दि.14) या बेडचे लोकार्पण करण्यात आले.

लोकार्पण सोहळ्यावेळी नगरसेवक संदीप वाघेरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक डब्बू आसवानी, माजी नगरसेवक संतोष कुदळे, सामाजिक कार्यकर्ते प्रविण कुदळे, संजय गायके आदी मान्यवर उपस्थित होते.

शहरात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. अशात वैद्यकीय यंत्रणेवर ताण पडत असून, सामाजिक बांधिलकी म्हणून मित्र सहकार्य तरुण मंडळाने जिजामाता रुग्णालयास दहा ऑक्सिजन बेड देण्यात आले.

जिजामाता रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. संगिता तिरुमणी यांनी मंडळाचे आभार मानले.

कार्यक्रमाच्या नियोजनासाठी एकनाथ पारखे, कुणाल सातव, प्रसाद सातव, रविंद्र कदम, रोहन कोल्हे, डॉ. अनिकेत अमृतकर, अक्षय नाणेकर, रामदास कुदळे, शक्ती खराडे, सोमेश जमदाडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंदा कुदळे यांनी तर, संदीप कुदळे यांनी प्रास्ताविक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.