Pimpri corona Update : शहरात आज 573 नवीन रुग्णांची नोंद, 220 कोरोनामुक्त, एक मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 573 नवीन रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली आहे. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 101 नवीन रुग्ण सापडले.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 220 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. पिंपरीतील 72 वर्षीय एका महिलेचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला.

_MPC_DIR_MPU_II

शहरात आजपर्यंत 1 लाख 8405 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 1 लाख 1934 जण बरे होऊन घरी गेले. शहरातील 1856 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 779 अशा 2635 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 1265 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर 1152 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहे. आजपर्यंत 34 हजार 387 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. आज दिवसभरात 3415 लाभार्थ्यांनी लसीकरण करुन घेतले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.