Pimpri Corona news: नॉन कोविड रुग्णांवर आजपासून ‘वायसीएमएच’मध्ये उपचार – आयुक्त हर्डीकर

नॉन कोविड रुग्णांसाठी 50 टक्के भाग

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या उतरणीस आली आहे. तांत्रिक बाबींची पडताळणी करून कोविड समर्पित वायसीएम रुग्णालय आज (मंगळवार) पासून नॉन कोविड रुग्णांसाठी 50 टक्के भागात सुरू केले असल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. या रुग्णांना कोविडचा संसर्ग होऊ नये याची खबरदारी घेणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय ( वायसीएम) कोविड समर्पित रुग्णालय म्हणून घोषित केले होते. इतर आजार असलेल्या रुग्णांवर उपचार केले जात नव्हते. त्यामुळे इतर आजार असलेल्या रुग्णांचे हाल होत होते.

सप्टेंबरपासून कोरोनाची रुग्णसंख्या उतरणीस लागली. त्यामुळे वायसीएम रुग्णालय खुली करण्याची मागणी होत होती. याबाबत सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

आजपासून इतर रुग्णांसाठी वायसीएमएच 50 टक्के सुरू केले आहे. वायसीएममध्ये दोन जिने आहेत. मधले वेगवेगळे आहेत. एका बाजूने कोविड तर एका बाजूने नॉन कोविड रुग्णांसाठी एंट्री ठेवली जाणार आहे.

नॉन कोविड रुग्णांना कोविडचा संसर्ग होऊ नये याची खबरदारी घेणार आहोत. त्यासाठी अभ्यासपूर्ण नियोजन सुरू असल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, गणोशोत्सवानंतर शहरातील रुग्णसंख्येत वाढ झाली होती. नवरात्र उत्सवात रुग्णवाढ झाली नाही. मात्र, गुजरात, पश्चिम बंगाल इतके आपल्याकडे नवरात्रीला महत्व नाही.

त्यामुळे आपल्याकडे नवरात्रीनंतर रुग्णसंख्या वाढलेली नाही; मात्र आताच उतरता आलेख पाहून दिवाळीत नागरिक बेफिकीर राहण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर दुसरी लाट येईल, अशी भीती आहे. कोरोना आपल्यातून गेलेला नाही.

दुसरी लाट येवू द्यायची नसेल तर, बेफिकिरी राहून चालणार नाही. आताच नियोजन आणि व्युहरचना करावी लागणार आहे. कोविड केअर सेंटर पूर्ण अर्थाने बंद केलेले नाहीत.

तीन हजार बेडची उपलब्धतता आहे. खासगी रुग्णालयांना नॉन कोविडसाठी बेड उपलब्ध करून देण्याचा सूचना दिल्या आहेत. जम्बो, ऑटो क्लस्टर 100 टक्के क्षमतेने चालू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.