Pimpri Corona News: चिंताजनक! दहा दिवसात कोरोनाने 423 रुग्ण दगावले

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या दुस-या लाटेने कहर केला आहे. वाढत्या रुग्णसंख्येबरोबच मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मृतांमध्ये कमी वयोगटातील रुग्णांचाही समावेश आहे. गतवर्षी एप्रिल महिन्यात केवळ सात जण दगावले होते.  यंदा एप्रिलमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मागील दहा दिवसात 423 रुग्ण दगावले आहेत.

पिंपळेगुरव, चिखली, रावेत, चिंचवड, वाकड, भोसरी, पिंपरी येथील सर्वाधिक मृत्यू होत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात मागील लाटेपेक्षा कोरोनाची दुसरी लाट अतिशय भयंकर आहे. या लाटेत रुग्णसंख्येत प्रचंड वेगाने वाढ होत आहे. बेशिस्तीमुळे रुग्णसंख्या वाढत आहे. परिणामी, खाट मिळणे कठिण होत आहे.

_MPC_DIR_MPU_II

आयसीयू, व्हेंटिलेटरच्या खाटा मिळत नाहीत. त्यामुळे आयसीयू उपचार मिळण्यात मोठ्या अडचणी येतात. याच कारणामुळे कमी वयाचे रुग्ण देखील दगावत आहेत.

वेळेत उपचार आणि आयसीयू खाट मिळाली. तर, हे प्रमाण कमी होऊ शकते. वाढते रुग्णसंख्येबरोबर मृतांचा आकडाही उच्चांक गाठताना दिसून येत आहे.

मृतांमध्ये कमी वयोगटातील रुग्णांचाही समावेश आहे. 25, 30, 35, 40 या वयोगटातील रुग्णांचाही मृत्यू होत आहे. ही बाब चिंताजनक आहे.

मागील दहा दिवसात 423 जण दगावले आहेत. 9 एप्रिल रोजी 23 जण दगावले, 10 एप्रिल 28, 11 एप्रिल 30, 12 एप्रिल 34, 13 एप्रिल 41, 14 एप्रिल  45, 15 एप्रिल सर्वाधिक  61 रुग्ण दगावले, 16 एप्रिल 54, 17 एप्रिल 54 आणि 18 एप्रिल रोजी 53 असे 423 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.