Pimpri Corona News: नेहरुनगर येथील जम्बो कोविड केअर सेंटर सुरु

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियममधील जम्बो कोविड केअर सेंटर पुन्हा सुरु केले आहे.  ऑक्सीजन, व्हेंटिलेटर, आयसीयू अशा 200 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या तिथे 25 रुग्ण उपचार घेत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. महापालिका रुग्णालये, कोविड केअर सेंटर फुल्ल झाले आहेत. त्यामुळे नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे 816 बेडचे अद्ययावत असलेले जम्बो कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने पीएमआरडीएतर्फे पिंपरीतील नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे 816 बेडचे अद्ययावत जम्बो कोविड केअर सेंटर उभारण्यात आले होते. 1 सप्टेंबर 2020 पासून हे जम्बो कोविड केअर सेंटर रुग्णांच्या सेवेसाठी सुरु झाले होते. रुग्णसंख्या कमी झाल्याने 1 जानेवारी पासून जम्बो सेंटर बंद करण्यात आले होते.

आता पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागल्याने जम्बो कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. जम्बो सेंटरमध्ये 200 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. 100 ऑक्सीजन बेड, 50 व्हेंटिलेटर आणि 50 आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. ऑक्सीजनची आवश्यकता असलेले 25 रुग्ण जम्बोत उपचार घेत असल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.