Pimpri corona News: रुग्ण वाढले, शहरातील ‘हे’ 19 भाग कंटेन्मेट झोन घोषित

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दाट लोकवस्ती असलेल्या ‘ब’, ‘ड’ आणि ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण सापडत असून 19 भाग कंटेन्मेट झोन घोषित केले आहेत. तर 11 रुग्ण सापडल्याने चिंचवडमधील मोरया गोसावी राजपार्क सोसायटी कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केली असून पूर्णपणे सील केली असल्याचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.

गृहनिर्माण सोसायटीतील एखाद्या इमारतीमधील मजल्यावर दोनपेक्षा अधिक रुग्ण सापडल्यास तो मजला सील केला जातो. महापालिकेने आकुर्डी, संभाजीनगर, जाधववाडी, दत्तनगर, घरकुल, जुनी सांगवी सातपुडा सोसायटी, मधुबन, बौध्दनगर, विजयनगर काळेवाडी, नढेनगर, पिंपरीगावातील अशोक थेटर, पिंपळेसौदागर येथील रोजलँड रेसिडेन्सी, प्लॅनेट मिलेनिअम, रावेत येथील म्हस्के वस्ती, शिंदे वस्ती, भोंडवे कॉर्नर, चिंचवडेनगर येथील आदर्श हाऊसिंग सोसायटी, सोनिगरा ओपेल, असे 19 भाग कंटेन्मेट झोन म्हणून घोषित केले असल्याचे आयुक्त पाटील यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

विनामास्क फिरणा-यांकडून 1 कोटी 64 लाखांचा दंड वसूल

कोरोना विषयक नियमांचे पालन न करणा-यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. विना मास्क फिरणा-या नागरिकांकडून एकूण 1 कोटी 64 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच रस्त्यावर थुंकणा-या नागरिकांकडून एकूण 8 लाख 21 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याचेही आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.