Pimpri: लॉकडाऊनमध्ये रुग्णवाढ होणारच, लॉकडाऊन उठल्यानंतर परिणाम दिसेल- आयुक्त हर्डीकर

Pimpri: Corona patient will increases in Lockdown, results will be seen after lockdown: Commissioner shravan Hardikar लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी शहरात तब्बल 557 रुग्ण सापडले होते. त्यामुळे लॉकडाऊनचा परिणाम होईल की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

एमपीसी न्यूज- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात लॉकडाउन केला आहे. लॉकडाऊनमध्ये रुग्णवाढ कमी होणार नाही. नागरिक आता घरात असल्याने प्रसार होणार नाही. जास्तीत-जास्त बाधित लोकांना शोधणे हा हेतू आहे. त्यामुळे काही आकडा वाढेल. वाढ कमी होईल असे नाही. पण, लॉकडाऊन संपल्यानंतर त्याचा फायदा होईल, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा घट्ट झाला आहे. झपाट्याने रुग्णवाढ होत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरात 14 ते 23 जुलै असा दहा दिवस लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

पण, लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी शहरात तब्बल 557 रुग्ण सापडले होते. त्यामुळे लॉकडाऊनचा परिणाम होईल की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

त्यापार्श्वभूमीवर ‘एमपीसी न्यूज’ने आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी संवाद साधला. आयुक्त हर्डीकर म्हणाले, लॉकडाऊनमध्ये रुग्णवाढ कमी होणार नाही. कारण, चाचण्या वाढविल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये जास्तीत-जास्त बाधित लोकांना शोधणे हा हेतू आहे.

त्यामुळे काही आकडा वाढेल. चाचण्या वाढविण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे वाढ कमी होईल असे नाही. पण, लॉकडाऊन संपल्यानंतर त्याचा फायदा होईल. नागरिक आता घरात आहेत. त्यामुळे प्रसार होणार नाही.

या काळात जास्तीत-जास्त लोकांना शोधून काढता येईल. लॉकडाऊन उघडल्यानंतर प्रसार करणा-यांची संख्या कमी झाल्याने पुढचा प्रसार कमी होईल. लक्षणे नसलेल्या रुग्णांकडून फार धोका नसतो.

तरी पणे ते सुद्धा थोडाफार प्रसार करु शकतात. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लक्षणे असलेल्या रुग्णांना लवकर शोधायचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.