Pimpri: कोरोनाचे रुग्ण आता ‘या’ सात खासगी रुग्णालयातही ठेवणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचे रुग्ण आता खासगी रुग्णालयात देखील ठेवण्यात येणार आहेत. संशयीत रुग्णाच्या घश्यातील द्रव्यांचे नमुने घेवून ‘एनआयव्ही’कडे तपासणीसाठी पाठविणे. या रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार करणे यासाठी राज्य सरकारने निर्देशित केलेल्या समितीमार्फत मान्यता देण्यात आली आहे.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि नविन भोसरी रुग्णालयामध्येच कोरोना बाधित, संशयीत रुग्णांना ठेवले जात होते. याच रुग्णालयातून कोरोनासाठी घश्यातील द्रव्यांचे नमुने ‘एनआयव्ही’कडे तपासणीसाठी पाठविण्यात येत होते. शहरात संशयीत रुग्णांची संख्या वाढत आहे. दररोज संशयीत रुग्ण नव्याने दाखल होत आहेत. होम क्वारंटाईनमध्ये तब्बल  1 हजार 276 नागरिक आहेत.

त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील सात खासगी रुग्णालयाचा वापर केला जाणार आहे. त्यामध्ये डॉ. डी.वाय. पाटील हॉस्पिटल- संत तुकारामनगर, आदित्य बिर्ला हॉस्पिटल-थेरगाव, निरामय हॉस्पिटल-चिंचवड, लोकमान्य हॉस्पिटल-निगडी, लोकमान्य हॉस्पिटल-‍ चिंचवड, स्टर्लिंग हॉस्पिटल-प्राधिकरण, ऍकॉर्ड ( जुने संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल) हॉस्पिटल-स्पाईन रोड मोशी) येथे कोरोनाच्या संशयीत रुग्णाच्या घश्यातील  द्रव्यांचे नमुने  घेऊन ‘एनआयव्ही’कडे तपासणीकरीता पाठविणे.  या रुग्णांवर उपचार करणे यासाठी राज्य सरकारने निर्देशित केलेल्या समितीमार्फत मान्यता देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.