Pimpri: कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील डॉक्टरांनंतर आता 50 कर्मचारीही ‘निगेटीव्ह’

एमपीसी न्यूज – पिंपरीतील एका  खासगी रुग्णालयातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या उपचारादरम्यान संपर्कात आलेल्या  42 डॉक्टरांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर आज 50 कर्मचा-यांचेही रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत.  डॉक्टर, कर्मचा-यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान,  महापालिका रुग्णालयातील 19 संशयितांचे रिपोर्ट देखील निगेटीव्ह आले आहेत.

शनिवारी (दि. 4) कोरोना पॉझिटीव्ह आढळलेल्या  रिक्षाचालक रुग्णाचे  पिंपरीतील एका खासगी रुग्णालयात ऑपरेशन झाले होते. रिक्षाचालक कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने ऑपरेशन करणा-या डॉक्टर, कर्मचा-यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्याचे ऑपरेशन  करणारे 42 डॉक्टर आणि 50 कर्मचा-यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. सगळ्यांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविण्यात आले होते.

त्यातील 42 डॉक्टरचे  रिपोर्ट सोमवारी (दि. 6) रात्री निगेटीव्ह आले होते. त्यानंतर आज 50 कर्मचा-यांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.