Pimpri : कोरोना; अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना टाळ्या, घंटानादद्वारे सॅल्यूट

एमपीसी न्यूज: कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टर, नर्स  यांचे  पिंपरी चिंचवड, राज्य तसेच देशभरातील नागिकांनी आभार मानून त्यांना सॅल्यूट केला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टर, नर्स यांचा टाळ्या, घंटानाद,  शंखनाद  करून आभार मानन्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आज सायंकाळी पाच वाजता नागरिकांनी आपापल्या सोसायट्यामधून, गॅलरीत उभे राहून आरोग्य सेवा पुरविणाऱ्यांविषयी आभार मानले. 

पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागात सायंकाळी पाच वाजताच नागरिक आपआपल्या घरासमोर येऊन थाळीनाद व टाळ्या वाजवून अहोरात्र आरोग्य सेवा पुरविणाऱ्या डॉक्टर, नर्स तसेच पोलीस व प्रशाकीय अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे आभार मानले. पाच वाजल्यानंतर सर्वत्र जल्लोषमय वातावरण निर्माण झाले. काहींनी शिट्या वाजविल्या तर काहींनी शंखनाद करून डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यामध्ये लहानमुलांसह सर्व वयोगटातील नागरिकांनाचा उत्स्फूर्त सहभाग पहायला मिळाला.

पुण्यातील  डेक्कन,  शिवाजीनगर,  धनकवडी,  धायरी,  वडगाव,   सिंहगड रोड,  शिवणे,  या भागात थाळीनाद करण्यात आला. लोक सध्या टेरेस आणि बाल्कनीत मोठ्या संख्येने जमले आहेत. रात्री 9 पर्यंत हा जनता कर्फ्यु असला तरी त्यानंतरही पुणेकरांनी बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

आज ( रविवारी) देशभरातील  जनता  कडकडीत बंद पळून जनता कर्फ्यू पाळत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.