Pimpri: हुश्श ! कोरोना संशयित 102 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना संशयित 102 जणांचे रिपोर्ट आज (गुरुवारी) निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे ही दिलासादायक बाब मानली जात आहे. तर, शहरातील 309 जणांचे रिपोर्ट प्रतिक्षेत आहेत.

पिंपरी महापालिकेने कोरोना संशयितांचे रिपोर्ट तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले होते. त्यामध्ये शहरातील 102 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. महापालिका रुग्णालयात 87 कोरोना सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, आजपर्यंत शहरातील 252 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 142 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

तर, आजपर्यंत शहरातील सात आणि शहराबाहेरील पण महापालिका रुग्णालयात अशा 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, आज दिवसभरात चिंचवड स्टेशन, दिघी, पिंपळेसौदागर, वाल्हेकरवाडी, पिंपरी आणि मुंबईतील रहिवासी पण महापालिका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अशा 13 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 221

# पॉझिटीव्ह रुग्ण – 13

#निगेटीव्ह रुग्ण – 102

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 309

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 407

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 103

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 252

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 87

# शहरातील कोरोना बाधित 16 रुग्णांवर महापालिका क्षेत्राबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 16

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 142

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 28660

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 90560

पिंपळेसौदागरमधील ‘हा’ परिसर सील !

पिंपळे सौदागर परिसरात आज पुन्हा कोरोनाचे पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पिंपळेसौदागर येथील (गणेशम सोसायटी-गणेशम फेज 1 – मयुरेश्वर रोड-वाघव्हिला) हा परिसर आज रात्री 11 वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आला.

या परिसरात प्रवेशबंदी आणि परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.