Pimpri Corona Update : शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या 80 हजाराच्या उंबरठ्यावर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 816 जणांना आज (शनिवारी) डिस्चार्ज देण्यात आला आहे. विविध भागातील 598 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 79 हजार 933 झाली आहे. रुग्णसंख्या 80 हजाराच्या उंबरठ्यावर आहे.

शहरातील 11 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 11 अशा 22 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात चिंचवड, च-होली, प्राधिकरण, थेरगाव, चिखली, मोशी, चिंचवड, भोसरी, आंबेगाव, कात्रज, अलिबाग, कामशेत, भिगवण, चाकण, तळेगाव दाभाडे, हडपसर येथील रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

शहरात आजपर्यंत 79 हजार 936 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 67 हजार 806 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 1348 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 511 अशा 1859 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 3466 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.