Pimpri Corona Udate : पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी नवीन 423 रुग्णांची भर; 319 रुग्णांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 28) 423 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात 319 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 1 लाख 5 हजार 704 एवढी झाली आहे. तर आजवर 1 लाख 392 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवारी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा रुग्ण चिंचवड (पुरुष, 71 वर्ष) येथील आहे.

_MPC_DIR_MPU_II

आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 1 हजार 842 तर शहराच्या बाहेरील 772 रुग्णांचा शहरातील रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

शहरात 3 हजार 470 रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील 2 हजार 534 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 936 जणांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. शहरातील 143 रुग्णांवर शहराच्या बाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 1 हजार 342 जणांचे चाचणी अहवाल प्रतीक्षेत आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात एकालाही कोरोना प्रतिबंध लस देण्यात आली नाही. आजवर शहरातील 22 हजार 826 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.