_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pimpri Corona Upadate : दिलासादायक ! नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्ण जास्त, शहरात आज 1327 नवीन रुग्णांची नोंद, 2057 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत आहे. नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्ण जास्त आहेत. शहराच्या विविध भागातील 1 हजार 327 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (गुरूवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 2 हजार 57 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील 47 आणि महापालिका हद्दीबाहेरील 26 अशा 73 जणांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 3 हजार 516 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 38 हजार 752 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

_MPC_DIR_MPU_II

सध्या 21 हजार 308 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 15 हजार 308 रुग्ण गृहविलगीकरणात असून 6 हजार सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 352 आणि माक्रो कंटेन्मेंट झोनची संख्या 2 हजार 152 वर गेली आहे. आजपर्यंत 4 लाख 53 हजार 524 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.