Pimpri Corona Update: शहरात आज 54 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 54 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (रविवारी) नोंद झाली.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 629 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 71 हजार 428 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 368 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 358 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.
तर, 10 रुग्ण महापालिका रुग्णालयामध्ये दाखल आहे. आज दिवसभरात 810 नागरिकांचे लसीकरण झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.