Pimpri Corona Update: पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी नवीन 1 हजार 4 रुग्ण; एकूण संख्या 55 हजार 234

Pimpri Corona Update: 1004 new patients in Pimpri-Chinchwad city on Sunday; The total number is 55234 पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीच्या बाहेरील 37 रुग्णांचे आज निदान झाले. सध्या 992 रुग्णांवर पिंपरी चिंचवड शहरात उपचार सुरू आहेत.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (दि. 6) 1 हजार 4 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बधितांची एकूण संख्या 55 हजार 234 झाली आहे. दिवसभरात 6 रुग्णांचा मृत्यू झाला असून 913 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सध्या 6 हजार 226 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

रविवारी 913 जणांना पूर्ण उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आजवर एकूण 46 हजार 401 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज मृत झालेले रुग्ण चिंचवड (पुरुष 79 वर्षे), दापोडी (पुरुष 70 वर्षे), भोसरी (खी 65 वर्षे) चाकण (स्त्री 55 वर्ष), अहमदनगर (पुरुष 84 वय), बंगाल (पुरुष 84 वर्षे) येथील रहिवासी आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीच्या बाहेरील 37 रुग्णांचे आज निदान झाले. सध्या 992 रुग्णांवर पिंपरी चिंचवड शहरात उपचार सुरू आहेत. बाहेरील 221 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील 326 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रविवारी 11 हजार 41 घरांना पालिकेच्या वैद्यकीय विभागाने भेट दिली. त्यातील 37 हजार 163 नागरिकांचे सर्वेक्षण केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.