Pimpri corona update : शहरात आज नवीन 1 हजार 28 रुग्ण; एकूण संख्या 63 हजार 622

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 6) 1 हजार 28 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बधितांची एकूण संख्या 63 हजार 622 झाली आहे. दिवसभरात 30 रुग्णांचा मृत्यू झाला असून 1 हजार 682 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहरात सध्या 6 हजार 616 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

रविवारी 1 हजार 682 जणांना पूर्ण उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आजवर एकूण 53 हजार 132 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज महापालिका हद्दीतील 13 आणि हद्दीबाहेरील 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे रुग्ण चिखली (पुरुष 65 वर्षे, पुरुष 35 वर्षे), आकुर्डी (पुरुष 64 वर्षे), भोसरी (पुरुष 66 वर्षे, पुरुष 69 वर्षे, स्त्री 54 वर्षे), पिंपळे गुरव (पुरुष 69 वर्षे), चिंचवड (पुरुष 67 वर्षे), रहाटणी (पुरुष 50 वर्षे),निगडी (स्त्री 54 वर्षे पुरुष 69 वर्षे), दिघी (पुरुष 57 वर्षे), आंबेगाव (पुरुष 70 वर्षे, पुरुष 54 वर्षे, पुरुष 68 वर्षे), सातारा (पुरुष 66 वर्षे, पुरुष 47 वर्षे), पुणे (पुरुष 45 वर्षे, पुरुष 47 वर्षे, स्त्री 65 वर्षे), खेड (पुरुष 70 वर्षे, पुरुष 69 वर्षे), जुन्नर (स्त्री 68 वर्षे), अहमदनगर (पुरुष 81 वर्षे, (स्त्री 60 वर्षे), मावळ (पुरुष 65 वर्षे), वाघोली (पुरुष 75 वर्षे), धनकवडी (पुरुष 58 वर्षे), कौसे (पुरुष 35 वर्षे), रावेत (स्त्री 82 वर्षे)येथील रहिवासी आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीच्या बाहेरील 17 रुग्णांचे आज निदान झाले. सध्या 1 हजार 164 रुग्णांवर पिंपरी चिंचवड शहरात उपचार सुरू आहेत. बाहेरील 291 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील 390 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.