Pimpri Corona Update : शहरात 1039 सक्रिय रुग्ण, 142 नवीन रुग्णांची नोंद

163 कोरोनामुक्तांना आज डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 142 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 163 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर, शहरात एकूण 1 हजार 39 सक्रिय रुग्ण आहेत.

शहरातील 2 आणि महापालिका हद्दीबाहेरील 3 अशा 5 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 335 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 63 हजार 613 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 1 हजार 39 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 356 रुग्ण गृहविलगीकरणात असून 683 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 38 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 408 आहेत. आज दिवसभरात 7 हजार 692 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आजपर्यंत 9 लाख 77 हजार 883 जणांनी लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.