Pimpri Corona Update : शहरात 1084 सक्रिय रुग्ण ! आज 151 नवीन रुग्णांची नोंद

159 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 151 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली. आजमितीला शहरात 1 हजार 84 सक्रिय रुग्ण आहेत. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 159 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 3 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 328 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 63 हजार 150 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

सध्या 1 हजार 84 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 265 रुग्ण गृहविलगीकरणात असून 819 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 39 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 410 आहेत. आज दिवसभरात 3 हजार 429 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आजपर्यंत 9 लाख 54 हजार 534 जणांनी लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.