Pimpri Corona Update: पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी नवीन 1092 रुग्ण; एकूण संख्या 29 हजार 197

Pimpri Corona Update: 1092 new patients in Pimpri-Chinchwad on Sunday; Total number 29197 रविवारी 952 जणांना पूर्ण उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आजवर एकूण 20 हजार 264 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (दि. 9) 1 हजार 92 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बधितांची एकूण संख्या 29 हजार 197 झाली आहे. 17 रुग्णांचा मृत्यू झाला असून 952 जणांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सध्या 4 हजार 871 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

रविवारी 952 जणांना पूर्ण उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आजवर एकूण 20 हजार 264 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज मृत झालेले रुग्ण- चिंचवड (पुरुष 55 वर्ष), चिखली (पुरुष 80 वर्ष), किवळे (पुरुष 51 वर्ष), काळेवाडी (स्त्री 47 वर्ष), भोसरी (पुरुष 6 वर्ष), खराळवाडी (पुरुष 51 वर्ष), देहुरोड (स्त्री 47 वर्ष), कात्रज (स्त्री 44 वर्ष), चाकण (स्त्री 35 वर्ष), बिबेवाडी (स्त्री 63 वय), दौंड (पुरुष 14 वर्ष), चाकण (पुरुष 70 वर्षे), जळगाव (पुरुष 64 वर्ष) तसेच पुणे महापालिका हद्दीमधील रूग्णालयात मृत झालेले रूण (पुरुष 68 वर्ष), चिखली (पुरुष 51 वर्ष) चिंचवड (पुरुष 84 वर्ष), बोपखेल (पुरुष 78 वर्षे) येथील रहिवासी आहेत,

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीच्या बाहेरील एकाही रुग्णांचे आज निदान झाले नाही. सध्या 386 रुग्णांवर पिंपरी चिंचवड शहरात उपचार सुरू आहेत. बाहेरील 116 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील 56 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रविवारी 16 हजार 821 घरांना पालिकेच्या वैद्यकीय विभागाने भेट दिली. त्यातील 55 हजार 202 नागरिकांचे सर्वेक्षण केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.