Pimpri Corona Update : शहरात 1112 सक्रिय रुग्ण, आज 227 नवीन रुग्णांची नोंद

224 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 227 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली. शहरात 1 हजार 112 सक्रिय रुग्ण आहेत. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 224 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 1 आणि महापालिका हद्दीबाहेरील 1 अशा 2 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 322 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 62 हजार 613 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

सध्या 1 हजार 112 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 245 रुग्ण गृहविलगीकरणात असून 867 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 44 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 413 आहेत. आज दिवसभरात 3 हजार 614 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आजपर्यंत 9 लाख 45 हजार 796 जणांनी लस घेतली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.