Pimpri Corona Update: शहरात आज 113 नवीन रुग्णांची नोंद, 78 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 113 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 78 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 2 आणि महापालिका हद्दीबाहेरील 1 अशा 3 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 436 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 73 हजार 745 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 794 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 396 रुग्ण गृहविलगीकरणात असून 398 सक्रीय रुग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 42 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 423 आहेत. आज दिवसभरात 20 हजार 145 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आजपर्यंत 19 लाख 34 हजार 259 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.