Pimpri Corona Update : शहरात आज 118 नवीन रुग्णांची नोंद, 82 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड (Pimpri Corona Update) शहराच्या विविध भागातील 118 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 82 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 624 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 61 हजार 691 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 924 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 894 रुग्ण  गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

Mumbai Building Collapse : कुर्ल्यात कोसळली चार मजली इमारत, 11 जण मृत्युमुखी

तर,30 रुग्ण महापालिका  रुग्णालयामध्ये दाखल आहे. आज दिवसभरात 2 हजार 461 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 36 लाख 47 हजार 989 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.