Pimpri corona Update : शहरात आज 119 नवीन रुग्णांची नोंद, 220 जणांना डिस्चार्ज; 8 मृत्यू

शहरात 'यूके स्ट्रेन'चा एकही रुग्ण नाही

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 119 नवीन रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली आहे. तर उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 220 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, ‘यूके स्ट्रेन’चा शहरात एकही रुग्ण नाही. चौघांचा रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

महापालिका हद्दीतील चार आणि पालिका हद्दीबाहेरील चार अशा आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये चिंचवड येथील 62, 88 वर्षीय दोन पुरुष, पिंपरीतील 57 वर्षीय पुरुष, भोसरीतील 60 वर्षीय महिला, जुन्नर येथील 48 वर्षीय पुरुष, साता-यातील 56 वर्षीय पुरुष, पुण्यातील 60 वर्षीय महिला, शेलपिंपळगाव येथील 80 वर्षीय महिला रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे.

दरम्यान, मागील 24 तासात कोरानाने शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यापुर्वी झालेल्या तीन मृत्यूची नोंद वैद्यकीय विभागाने आज सांगितली आहे.

शहरात आजपर्यंत 98 हजार 185 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 94 हजार 900 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1778 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 743 अशा 2521 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 601 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1476 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.

शहरात यूके स्ट्रेनचा एकही रुग्ण नाही !

इंग्लंडहून मुंबईत उतरलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील 268 प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी 7 प्रवाशांचे नमुने एनआयव्ही पुणे येथे UK स्ट्रेन करीता जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठविले होते. 3 अहवाल UK स्ट्रेन B.1.1.7 करीता सकारात्मक आले होते. त्यांचे 14 दिवसानंतर 24 तासांचे अंतराने घेतलेले स्वॉब निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

तसेच एक अहवाल प्रलंबित असलेल्या रुग्णाचा 14 दिवसानंतर 24 तासाच्या अंतराने घेतलेले स्वॉब निगेटीव्ह आढळून आला. त्यामुळे त्याला घरी सोडण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.