Pimpri Corona Update : शहरात आज 12 नवीन रुग्णांची नोंद; 6 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 12 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (गुरूवारी) नोंद झाली. (Pimpri Corona Update) तर, कोरोनामुक्त झालेल्या 6 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 630 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.(Pimpri Corona Update) शहरातील 3 लाख 72 हजार 580 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 101 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 98  रुग्ण  गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

Dighi News : सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी प्रशासनाला 7 दिवसांचा ‘अल्टिमेटम’! 

तर, महापालिका  रुग्णालयामध्ये 3 रुग्ण दाखल आहेत.(Pimpri Corona Update) आज दिवसभरात 58 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 37 लाख 88 हजार 55 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.