Pimpri Corona Update : शहरात आज 12 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहराच्या(Pimpri Corona Update) विविध भागातील 12 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद करण्यात आली आहे. 

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 630 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.(Pimpri Corona Update)  शहरातील 3 लाख 72 हजार 592 जणांना आज पर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 94 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 81 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

Pimpri News : शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड सज्ज

तर, 3 रुग्ण महनगरपालिका रुग्णालयामध्ये दाखल आहे. आज दिवसभरात 278 नागरिकांचे लसीकरण झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.