Pimpri Corona Update : रविवारी शहरात 122 नवीन रुग्ण; 243 जणांना डिस्चार्ज
शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 2 लाख 73 हजार 450 एवढी झाली आहे. तर आजवर 2 लाख 68 हजार 903 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवारी शहरातील एका आणि शहराबाहेरील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 4 हजार 430 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शहरात 848 रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील 458 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 390 जणांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
पिंपरी चिंचवड शहरात रविवारी पालिकेच्या 69 आणि खासगी 132 लसीकरण केंद्रांवर 23 हजार 75 नागरिकांचे लसीकरण झाले. आजवर शहरातील 18 लाख 80 हजार 40 जणांनी लस घेतली आहे.