Pimpri Corona Update : पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी कोरोनाचे 123 नवीन रुग्ण; 64 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आज (रविवारी, दि. 6) पिंपरी-चिंचवड शहरात 123 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात 64 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 93 हजार 378 एवढी झाली आहे. तर आजवर 89 हजार 657 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवारी सहा रुग्णांचा मृत्यू झाला. आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 1 हजार 664 तर शहराच्या बाहेरील 684 रुग्णांचा शहरातील रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

शहरात 893 रुग्ण सक्रिय आहेत. त्यांच्यावर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. तर 1 हजार 164 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. शहरातील 116 रुग्णांवर शहराच्या बाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 1 हजार 565 जणांचे चाचणी अहवाल प्रतीक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.