Pimpri Corona Update : पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी नवीन 123 रुग्णांची भर; 151 रुग्णांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 17) 123 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात 151 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 98 हजार 861 एवढी झाली आहे. तर आजवर 95 हजार 563 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवारी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा रुग्ण दिघी (80 वर्ष, स्त्री) येथील आहे.

आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 1 हजार 786 तर शहराच्या बाहेरील 745 रुग्णांचा शहरातील रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

शहरात 622 रुग्ण सक्रिय आहेत. त्यांच्यावर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. तर 890 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. शहरातील 65 रुग्णांवर शहराच्या बाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 2 हजार 432 जणांचे चाचणी अहवाल प्रतीक्षेत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.