Pimpri corona Update : शहरात 125 नवीन रुग्ण, 191 जण कोरोनामुक्त, 5 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 124 आणि पालिका हद्दीबाहेरील 1 अशा 125 नवीन रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली आहे. शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 86 हजार 924 झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 191 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील 2 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 3 अशा 5 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात चिखलीतील 65 वर्षीय पुरुष, रावेत येथील 68 वर्षीय महिला, मुळशी 49वर्षीय , जुन्नर 57 वर्षीय पुरुष,खेड येथील 70 वर्षीय महिलचा मृत्यू झाला.

शहरात आजपर्यंत 86 हजार 924 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 83 हजार 209 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1511 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 625 अशा 2136 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 113 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 687 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.