Pimpri corona Update : शहरात आज 125 नवीन रुग्णांची नोंद, 60 जणांना डिस्चार्ज; 4 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागात आज (गुरुवारी) 125 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 96 हजार 608 वर पोहोचली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 60 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील दोन आणि महापालिका हद्दीबाहेरील दोन अशा चार जणांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात आकुर्डीतील 65 वर्षीय पुरुष, चिंचवड येथील 82 वर्षीय महिला, आंबेगाव मधील 45 वर्षीय पुरुष आणि निमगाव येथील 63 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 96 हजार 608 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 93 हजार 365 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1756 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 731 अशा 2487 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 632 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1511 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.

इंग्लंडहून आलेल्या 23 जणांचे अहवाल प्रलंबित !

इंग्लंडहून विमानाने मुंबईत उतरलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील 268 प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी 14 प्रवाशी भारतात परतलेले नाहीत. 50 प्रवाशी बाहेरगावी गेलेले आहेत. 16 प्रवाशांचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला आहे.

उर्वरीत 188 प्रवाशांची चाचणी केली असून त्यापैकी 159 नकारात्मक असून 6 अहवाल कोविड सकारात्मक आहेत. उर्वरित 23 अहवाल प्रलंबित आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.