Pimpri Corona Update : रविवारी शहरात 130 नवीन रुग्ण; 140 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 19) दिवसभरात 130 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 140 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 2 लाख 72 हजार 580 एवढी झाली आहे. तर आजवर 2 लाख 67 हजार 820 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रविवारी शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 4 हजार 419 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात एक हजार 72 रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील 566 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 506 जणांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी पालिकेच्या 69 आणि खासगी 132 लसीकरण केंद्रांवर 32 हजार 198 नागरिकांचे लसीकरण झाले. आजवर शहरातील 17 लाख 74 हजार 851 जणांनी लस घेतली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.