Pimpri Corona Update: शहरात 1322 सक्रिय रुग्ण! आज 168 नवीन रुग्णांची नोंद

148 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांच्या सख्येत वाढ होऊ लागली आहे. आजमितीला शहरात 1 हजार 322 सक्रिय रुग्ण आहेत. शहराच्या विविध भागातील 168 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 147 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 1 आणि महापालिका हद्दीबाहेरील 2 अशा 3 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 386 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 68 हजार 98 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 1 हजार 322 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 679 रुग्ण गृहविलगीकरणात असून 643 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 51 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 465 आहेत. आज दिवसभरात 4 हजार 78 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आजपर्यंत 13 लाख 5 हजार 365 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.