Pimpri Corona Update : गुरुवारी शहरात 135 नवीन रुग्ण; 180 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (गुरुवारी, दि. 23) दिवसभरात 135 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 180 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 2 लाख 73 हजार 99 एवढी झाली आहे. तर आजवर 2 लाख 68 हजार 306 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

गुरुवारी शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 4 हजार 425 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात एक हजार 99 रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील 712 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 387 जणांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात गुरुवारी पालिकेच्या 69 आणि खासगी 132 लसीकरण केंद्रांवर 16 हजार 850 नागरिकांचे लसीकरण झाले. आजवर शहरातील 18 लाख 38 हजार 257 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.