Pimpri Corona Update : पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी कोरोनाचे 137 नवीन रुग्ण; 90 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आज (सोमवारी, दि. 7) पिंपरी-चिंचवड शहरात 137 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात 90 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 93 हजार 515 एवढी झाली आहे. तर आजवर 89 हजार 747 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारी पाच रुग्णांचा मृत्यू झाला. हे रुग्ण भोसरी (57 वर्ष), वल्लभनगर (85 वर्ष), मोशी (34 वर्ष), थेरगाव (82 वर्ष), बारामती (80 वर्ष) येथील आहेत. आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 1 हजार 668 तर शहराच्या बाहेरील 685 रुग्णांचा शहरातील रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

शहरात 918 रुग्ण सक्रिय आहेत. त्यांच्यावर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. तर 1 हजार 182 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. शहरातील 124 रुग्णांवर शहराच्या बाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 913 जणांचे चाचणी अहवाल प्रतीक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.