Pimpri News: शहरात आज 142 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज, 123 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 123 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 142 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. शहरात आजमितीला एकूण 812 सक्रिय रुग्ण आहेत.

शहरातील 2 आणि महापालिका हद्दीबाहेरील 2 अशा 4 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 361 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 66 हजार 112 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 812 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 258 रुग्ण गृहविलगीकरणात असून 554 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 50 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 442 आहेत. आज दिवसभरात 4 हजार 152 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आजपर्यंत 11 लाख 72 हजार 189 जणांनी लस घेतली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.