Pimpri Corona Update : शहरात आज कोरोनाचे 147 नवीन रुग्ण; 122 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (शुक्रवारी, दि. 15) 147 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात 122 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 98 हजार 628 एवढी झाली आहे. तर आजवर 95 हजार 262 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शुक्रवारी पिंपरी चिंचवड शहरातील 3 रुग्णांचा मृत्यू झाला.

मृत्यू झालेले शहरातील रुग्ण काळेवाडी (47 वर्ष, पुरुष), वडमुखवाडी (83 वर्ष, पुरुष), थेरगाव (80 वर्ष, महिला) येथील आहेत.

आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 1 हजार 785 तर शहराच्या बाहेरील 645 रुग्णांचा शहरातील रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

शहरात 656 रुग्ण सक्रिय आहेत. त्यांच्यावर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. तर 925 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. शहरातील 60 रुग्णांवर शहराच्या बाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 2 हजार 131 जणांचे चाचणी अहवाल प्रतीक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.