Pimpri Corona Update: शहरात आज नवीन 149 रुग्णांची नोंद, 133 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 149 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 133 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

महापालिका हद्दीबाहेरील एकाचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 526 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 79 हजार 572 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 484 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 243 रुग्ण गृहविलगीकरणात असून 241 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 43 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 308 आहेत. आज दिवसभरात 7 हजार 42 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 29 लाख 89 हजार 299 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.