Pimpri Corona Update: शहरात आज 15 नवीन रुग्णांची नोंद, 3 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – राज्यातील काही भागात कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. पिंपरी – चिंचवड शहराच्या विविध भागातील 15 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (गुरुवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 3 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, आजमितीला एकही रुग्ण महापालिका रुग्णालयात दाखल नाही.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 624 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 59 हजार 796 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 73 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. सर्वच रुग्ण  गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. महापालिका  रुग्णालयामध्ये एकही रुग्ण दाखल नाही.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन एकही नाही. 36 मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. आज दिवसभरात 1 हजार 221 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 36 लाख 3 हजार 638 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.